parli aag.jpg 
मराठवाडा

Breaking News : परळीत लॅबला लागली आग, लाखोंचे उपकरणे जळून खाक 

सकाळवृत्तसेवा

परळी वैजनाथ : येथील महाराष्ट्र बॅंकेसमोर डॉ. मंडलेचा यांच्या इमारतीमध्ये असलेल्या हिंद लॅबला शुक्रवारी (ता.०३) सकाळी सहाच्या दरम्यान आग लागून पुर्ण लॅब जळून खाक झाली आहे. यामध्ये रक्त तपासणी लॅबचे लाखों रुपयाचे उपकरणे जळून खाक झाली. सुदैवाने लॅब मध्ये कोणतीही जिवीत हानी नाही. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

शहरातील सुभाष चौक परिसरात असलेल्या डॉ. मंडलेच्या यांच्या इमारतीमध्ये खाजगी हिंद रक्त तपासणी लँब आहे. शुक्रवारी पहाटे सहाच्या सुमारास परिसरातील नागरिकांना या इमारतीच्या वरच्या मजल्यावर असलेल्या लँब मधून धुर निघत असल्याचे दिसून आले. रहिवाशांनी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहचल्यामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. परिणामी पुढील अनर्थ टळला.


 यावेळी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे विभाग प्रमुख सुनील आदोडे, वाहन चालक रोहित आदोडे, व फायरमॅन धोंडीराम भुसेवाड, गंगाधर मस्के यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र हिंद रक्त तपासणी लँबच्या सर्व मशीन, उपकरणे जळून खाक झाली असून लाखों रूपयांचे नुकसान या आगीत झाले आहे. प्रथम दर्शनी ही आग शाँर्टसर्किट मुळे लागण्याचे सांगण्यात येत आहे.


 वाचा अवश्य : मंदीरे दर्शनासाठी खुली करा 
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांपासून देशभरात लॉकडाऊन पाळले जात आहे. या काळात सर्वकाही शासकीय आदेशानुसार बंद ठेवण्यात आले होते. आता परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी एकएका गोष्टीला चालू करण्याची परवानगी दिली जात आहे. लॉकडाऊनच्या आता तीसऱ्या महिन्यात जवळपास सर्वकाही सुरू करण्यात आले आहे. परंतू महाराष्ट्रातील देवालये आणखीही भक्तांना दर्शनासाठी सुरू करण्यात आलेली नाहीत. शासनाने आवश्यक अशी नियमावली तयार करून मंदीरे दर्शनासाठी खुली करावीत अशी मागणी प्रभू वैद्यनाथ देवस्थान विकास कृती समितीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी केली आहे.

संपूर्ण देशातील २६ राज्यांमध्ये मंदीरे दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. परंतू महाराष्ट्र सरकारने अद्याप अशी कोणतीही परवानगी दिलेली नसल्यामुळे सर्व मंदीरे अद्यापही बंद आहेत. येथील प्रभू वैद्यनाथाचे मंदीर हे बारा ज्योतीर्लिंगापैकी पाचव्या क्रमांकाचे ज्योतीर्लिंग असून, देशभरातून भाविक दर्शनासाठी दरवर्षी येतात. येत्या आठवडाभरापासून श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावण महिन्यात प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनाला विशेष महत्व असते. या पार्श्वभूमीवर शासनाने योग्य अशी नियमावली करून दर्शनासाठी परवानगी द्यायला हवी. प्रवाशी वाहतूक सुरू आहे, बाजारपेठा, हॉटेल्स आदी सर्वकाही सुरू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे लाखो लोकांचे श्रध्दास्थान असलेले प्रभू वैद्यनाथाचे मंदीरही सुरू केली जावे, अशी मागणी प्रभू वैद्यनाथ देवस्थान विकास कृती समितीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

80s Retro AI Trend Maharashtra : रे-बॅन गॉगल, जीन्स, यामाहा अन् १९८०चा लूक; शौमिका महाडिक, मुरलीधर मोहोळांसह नेत्यांचे रेट्रो फोटो व्हायरल

सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना लेकीनं सुनावलं, नेटकऱ्यांनाही सडेतोड उत्तर देत म्हणाली...

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Marathi News Live Updates : महादेवनगरमध्ये दुकान पेटवून दिल्याने खळबळ, पहाटे तिघांनी पेट्रोल ओतून लावली आग

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

SCROLL FOR NEXT